Drones Subsidy

Drones Subsidy । ड्रोन खरेदीसाठी तुम्हाला किती अनुदान मिळू शकत? जाणून घ्या एका क्लिकवर

शासकीय योजना

Drones Subsidy । शेतीत विविध बदल होऊ लागले आहेत. अलीकडच्या काळात ड्रोनच्या (Drones) सहाय्यानं खतं, कीटकनाशकांची फवारणी करणे, शेतीतल्या वेगवेगळ्या कामांसाठी ड्रोनचा वापर वाढू (Drones uses) लागला आहे. ड्रोन आणि त्यावरील उपकरणाला आता जमिनीवरुन रिमोट कन्ट्रोलच्या साह्याने नियंत्रित करता येते. या नेव्हिगेशन सिस्टीम, जीपीएस, वेगवेगळे सेन्सर्स, कॅमेरे असतात.

Farming on Solar । काय सांगता! ‘हे’ संपूर्ण गाव करतंय ‘सोलार’वर शेती

किमतीचा विचार करायचा झाला तर ड्रोनची किंमत (Drone price) साधारणपणे 6 ते 15 लाखांपर्यंत असते. तसेच ड्रोनचं आयुष्य हे 4 ते 5 वर्षांचं असतं. हे ड्रोन दीड ते दोन किलोमीटर लांब तर 400 फुटांपर्यंत उंच उडू शकतात. जर तुम्हाला ड्रोन खरेदी करायचे असेल आणि तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात पैसे नसतील तर काळजी करू नका. कारण ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकार अनुदान (Subsidy for drone) देणार आहे. (Agri Schemes Drones Purchase Subsidy)

Dairy Business Scheme । ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊन करा दुग्धव्यवसाय, व्याजाशिवाय मिळेल कर्जाचा लाभ

ड्रोन दीदी योजना

सरकारने नुकतीच ड्रोन दीदी योजना सुरु केली आहे. आता कृषी प्रशिक्षण संस्था आणि कृषी महाविद्यालयांना ड्रोन खरेदीसाठी 100 टक्के किंवा 10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना ड्रोन खर्चाच्या 75 टक्के अनुदान सरकारकडून उपलब्ध मिळत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना, महिला शेतकऱ्यांना आणि पुर्वोत्तर राज्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के किंवा 5 लाख रुपयांपर्यतचे अनुदान मिळते.

Onion Export Ban । कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना मोठा फटका! दरात झाली 50 टक्क्यांची घसरण, पाहा किती मिळतोय दर?

घ्या सरकारी अनुदानाचा लाभ

त्याशिवाय केंद्र सरकारकडून देशातील इतर शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर ड्रोन खरेदीसाठी 40 टक्के किंवा 4 लाखांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. ड्रोन महाग असल्याने प्रत्येकच शेतकरी तो खरेदी करू शकणार नाही. त्यामुळे सरकारी अनुदानाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. खरंतर ड्रोनद्वारे एक हेक्टर क्षेत्रावरील फवारणी केवळ 20 ते 30 मिनिटांत पूर्ण होते.

Subsidy for irrigation । शेतकऱ्यांनो, त्वरा करा; ठिबक आणि तुषार सिंचनासाठी मिळतंय अनुदान, सोप्या प्रकारे करा अर्ज

ट्रॅक्टर किंवा माणसानं स्वत: फवारणी करायची म्हटलं तर यापेक्षा जास्त वेळ लागतो. इतकेच नाही तर विषबाधा होऊन जीव दगावण्याची दाट शक्यता असते. ड्रोनच्या वापरामुळे जीवितहानी होत नाही. अलीकडच्या काळात मजूर टंचाईवर उपाय म्हणूनही ड्रोन शेतीकडे आश्वासक नजरेनं पाहण्यात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या.

Milk Rate । दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! अनुदानासाठी ‘या’ जिल्ह्याला दररोज मिळणार ११ लाख रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *