Garlic Price

Garlic Price । आनंदाची बातमी! लसणाने गाठला उच्चांक, किलोला मिळतोय 400 रुपये दर

बाजारभाव

Garlic Price । कांद्याची निर्यातबंदी (Onion export ban) केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना वाढत चालली आहे. कांदा निर्यातीवर अचानक बंदी, अशातच आधीच दुष्काळ आणि त्यानंतरच्या अवकाळी पावसाने (Heavy rain) हैराण झालेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लसणाच्या किमतीत कमालीची वाढ (Garlic rate hike) झाली आहे.

Drones Subsidy । ड्रोन खरेदीसाठी तुम्हाला किती अनुदान मिळू शकत? जाणून घ्या एका क्लिकवर

लसूण हा स्वयंपाक घरातील महत्त्वाचा पदार्थ आहे. लसणाशिवाय (Garlic) भाज्यांना चव येत नाही. यावर्षी खराब हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसला आहे. यात लसणाचाही समावेश आहे. हवामानाचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात लसणाचे उत्पादन घेतले जाते. येथे अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. (Garlic Prices increased)

Farming on Solar । काय सांगता! ‘हे’ संपूर्ण गाव करतंय ‘सोलार’वर शेती

लसणाचे वाढले दर

त्यामुळे उशिरा लसणाची काढणी झाल्याने दर वाढले आहेत. दराचा विचार केला तर मागील काही आठवड्यात देशातील किरकोळ बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 300 ते 400 रुपयांवर गेले आहेत. घाऊक बाजारात लसणाची किंमत 150 ते 250 रुपये इतकी झाली आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, जानेवारी अखेरपर्यंत किरकोळ बाजारात लसणाची किंमत प्रतिकिलो 250 ते 350 रुपयांच्या दरम्यान राहील.

Dairy Business Scheme । ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊन करा दुग्धव्यवसाय, व्याजाशिवाय मिळेल कर्जाचा लाभ

दर पुन्हा जैसे थे होण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. ग्राहकांना सध्या जास्त पैसे देऊन लसूण खरेदी करावा लागत आहे. भारतात 32.7 लाख टन लसणाचे उत्पादन होते. तर चीनमध्ये दरवर्षी सुमारे 2 ते 25 दशलक्ष टन लसणाचे उत्पादन होते. दोन्ही देशांमध्ये बहुतेक लसणाचा वापर देशांतर्गत केला जातो.

Onion Export Ban । कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना मोठा फटका! दरात झाली 50 टक्क्यांची घसरण, पाहा किती मिळतोय दर?

महाग झाली लसणाची फोडणी

स्वयंपाकघरात नेहमी वापरात असणारा तसेच अविभाज्य घटक असणारा लसूण वापरताना आता गृहिणींना हात आखडता घ्यावा लागेल. कारण लसणाची फोडणी महाग झाली आहे. मार्केटमध्ये लसणाची आवक कमी होत आहे. त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. दिवाळीपूर्वी तीस ते चाळीस रुपये किलो असलेला लसूण आता 400 च्या घरात पोहोचला आहे.

Subsidy for irrigation । शेतकऱ्यांनो, त्वरा करा; ठिबक आणि तुषार सिंचनासाठी मिळतंय अनुदान, सोप्या प्रकारे करा अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *