Strawberry Farming । अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीची (Strawberry) शेती केली जाऊ लागली आहे. हिवाळ्याच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते. मागणी जास्त असल्याने तिची किमतीत देखील वाढ होत असल्याचे पाहायला मिळते. (Strawberry price) खरंतर स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीज कमी असून तुम्ही जर फायबर युक्त स्ट्रॉबेरी खाल्ल्या तर तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यात आढळणारे व्हिटॅमिन सी तुमची चयापचय गती वाढवते. (Strawberry benefits)
Onion Rate । निर्यातबंदी हटवताच कांद्याचे दर वाढले?, किती मिळत आहे प्रतिक्विंटल भाव? जाणून घ्या
स्ट्रॉबेरी लागवडीसाठी मिळणार अनुदान
त्यामुळे शेतकरी स्ट्रॉबेरी लागवड करून चांगला नफा मिळवत आहे. अशातच आता स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता स्ट्रॉबेरी लागवडीसाठी (Strawberry cultivation) सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे. लागवडीसाठी जास्त खर्च येत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळाला आहे. (Strawberry cultivation subsidy)
मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदान देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती दिली. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना अधिक क्षमतेने आणि गुणवत्तापूर्ण स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेता येण्यासाठी शेतकऱ्यांसाठी लवकरच अनुदान योजना राबवली जाईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
Havaman Andaj । 7 राज्यांमध्ये अवकाळी आणि गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
“तसेच सर्व घटकांशी बोलून या स्ट्रॉबेरी लागवड अनुदान योजनेस अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. आपल्या उत्पादित शेतमालावर शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग सुरु केला तर त्यांना मोठा आर्थिक फायदा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसह प्रक्रिया उद्योगावर भर द्यावा,” असे आवाहन देखील यावेळी शिंदे यांनी केले.
Onion Export । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! सरकारने हटवली कांदा निर्यात बंदी
पुढे ते म्हणाले की, “शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये आर्थिक गुंतवणूक वाढवावी. सध्याच्या घडीला राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असून या योजनांचा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आर्थिक समृद्धी आणण्यासाठी पुरेपूर वापर करावा. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.