Agriculture News । शेतजमिनीवरून पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होणाच्या दृष्टीने खोदलेल्या तळ्यास शेततळे असे म्हणतात. हे तळे, नाला, ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते. शेतात तळे करून त्यात भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी साठवून त्याचा उपयोग संरक्षित जलसिंचनासाठी करता येतो. पावासाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो. अशावेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखादे दूसरे पाणी पिकास देता येते व त्यामुळे हमखास पीक येते.
शेततळ्याचे फायदे
- पाणलोट क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.
- आपत्कालीन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.
- पूरक सिचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
- चिबड व पाणथळ जमीन सुधारणेसाठी शेततळ्याचा चांगला उपयोग होतो.
- मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग होतो. दुग्धउत्पादनासारखे जोडधंदे करु शकतात
- पिकांवर औषधे फवारणीसाठी शेतात मुबलक पाणी उपलब्ध होते.
Viral Video । ऐकावं ते नवलच! संपूर्ण गावाने रेड्याचा वाढदिवस साजरा केला मोठ्या जल्लोषात
शेततळ्याचे प्रकार कोणते?
१. नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवुन
२. सपाट जमिनीतली शेततळे.
Crop insurance । खुशखबर! पहिल्या टप्प्यात सव्वाकोटी शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा
जागेची निवड कशी करावी?
- ज्या जमिनीत पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे. अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी. काळी जमीन व ज्या
- जमिनीमध्ये चिकणमातीचे प्रमाण जास्त असते अशी जमीन शेततळ्यास योग्य असते. पश्चिम घाट विभागामध्ये भात शेतीसाठी लॅटराईट जमिनीत सुद्धा शेततळे घेणे फायद्याचे असते..
- सर्व प्रकारच्यात पाटबंधारे प्रकल्पांच्या समावेश क्षेत्रात शेततळी येऊ नये.
- मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक किंवा खारवट अशी जमीन असलेली जागा शेततळ्यास निवडू नये.
शेततळ्यांतील पाणी जमिनीमध्ये वाया जाऊ नये म्हणून विशेष प्रकारच्या ५०० मायक्रॉन जाडीचा रिइनफोर्सड एच.डी. पी.ई. जिओमेंब्रेन (IS: १५३५: २००८) या दर्जाच्या प्लास्टिक फिल्मचा अस्तरीकरणासाठी वापर योग्य प्रकारे करावा.
शेततळे अस्तरीकरण (लायनिंग)
शेततळ्यांतील पाणी जमिनीमध्ये वाया जाऊ नये म्हणून विशेष प्रकारच्या ५०० मायक्रॉन जाडीचा रिइनफोर्सड एच.डी. पी.ई. जिओमेंब्रेन (IS: १५३५: २००८) या दर्जाच्या प्लास्टिक फिल्मचा अस्तरीकरणासाठी वापर योग्य प्रकारे करावा,