राज्याला सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्यातही मुबलक प्रमाणात पाऊस पडत नाही. पावसाविना पिके जळून जातात. यावर्षी पावसाने राज्याच्या काही भागांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. धरणाची पाणीपातळीही समाधानकारक नाही. अशातच अनेक शेतकरी बोअरवेलकडे (Borewell) पर्याय म्हणून पाहत आहेत. परंतु बोअरवेलला देखील पाणी लागले नाही तर पैसे वाया जातात.
Electricity | सर्वात मोठी बातमी! राज्यात होणार 3,500 मेगावॅट वीजनिर्मिती
बोअरवेल घेण्यापूर्वी अनेकजण पाणाड्याची (Underground Water) मदत घेतात. परंतु बऱ्याचवेळा पाणाड्याचाही अंदाज खोटा ठरतो. अशावेळी जमिनीतील पाण्याची पातळी किंवा जमिनीतील पाण्याचा स्त्रोत कसा शोधायचा असा अनेकांच्या मनात प्रश्न येतो. तुम्ही आता सोप्या पद्धतीने जमिनीत पाणी आहे की नाही, ते शोधून काढू शकता. कसे ते जाणून घ्या सविस्तर माहिती.
Sugarcane Rate । ‘उसाला पाच हजारांचा दर मिळाला पाहिजे’; शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी
नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने असे शोधा पाणी
भूजल शास्त्रज्ञ कडुलिंब, नारळ, ताड किंवा खजूर यासारखे झाडांची वाढ आणि त्यांच्या वाढीच्या दिशेचे निरीक्षण करतात. वास्तविक, झाडाच्या सर्व फांद्या कधीच झुकलेल्या नसतात. परंतु कधी कधी झाडाच्या फांद्या प्रमाणाच्या बाहेर खाली झुकल्याचे आपल्याला पाहायला मिळते. जर अशा झाडाच्या फांद्या खाली झुकलेल्या असतील तर त्या ठिकाणी पाण्याची पातळी जास्त प्रमाणात आहे असे समजावे. वाळवी असणाऱ्या जमिनीतही पाण्याचे प्रमाण जास्त असते.
शास्त्रीय पद्धती
पहिली विद्युत प्रतिरोधक सिद्धांत पद्धत आहे. या पद्धतीमध्ये संबंधित उपकरणाचे तार किंवा इलेक्ट्रोड आठ ते दहा इंच खोल जमिनीमध्ये गाडले जाते. तार किंवा इलेक्ट्रोडच्या माध्यमातून विद्युत प्रवाह जमिनीत सोडून भूजल पातळी शोधली जाते. विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून जे काही यंत्र असते त्याच्यावर रीडिंग येते आणि त्यावर पाण्याचा अंदाज लावला जातो.
Sugar Prices । सर्वसामान्यांना फटका! सणासुदीच्या काळात साखरेनं गाठला सर्वोच्च दर
तसेच दुसरी शास्त्रीय पद्धत रेजिस्टिव्हिटी इमेजिंग सिस्टीम आहे. या पद्धतीमध्ये जमिनीतील पाण्याचा अंदाज घेण्यासाठी सुधारित उपकरणाचे बारा किंवा 24 इलेक्ट्रॉन जमिनीत गाडण्यात येतात. त्यांच्या मदतीने जमिन आणि जमिनीमधील जे काही अंतर्गत घटकाच्या प्रतिमा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घेण्यात येतात. एक ते दीड तासांत सर्व माहिती मिळते. तज्ञांच्या मतानुसार जर वाळूचे प्रमाण जमिनीत जास्त असल्यास तर अशा ठिकाणी पाणी चांगले असते.
Kiwi Fruit । शेतकऱ्यांनो.. बक्कळ पैसा कमवायचा असेल तर करा किवी फळाची शेती, अशी करा लागवड