Insurance Complaint

Insurance Complaint । अवकाळीने पिकाचं नुकसान झालं आहे? ‘या’ पद्धतीने करा विम्याची तक्रार

बातम्या

Insurance Complaint । अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. हातातोंडाशी आलेल्या सर्व पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बागातदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Cow । भारत नाही तर ‘या’ ठिकाणी सर्वात अगोदर पाळली गेली गाय, जाणून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

अवकाळी पावसामुळे राज्यातील तूर, द्राक्ष, कापूस, भात आणि कांदा पिकाचे खूप नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, अहमदनगर, परभणी, नांदेड, बुलडाणा यासह इतर जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. काही शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांचा आणि फळपिकांचा विमा (Crop Insurance) काढला, तर त्यांना याचा फायदा होणार आहे.

Fertilizers licenses । राज्यातील विकास सोसायट्यांना मिळणार खतविक्रीचा परवाना, सहकार खात्याचा आदेश

.. तर मिळणार नाही मदत

परंतु, अनेकांना मदत कशी मिळवायची? हे माहिती नाही. गारपिटीमुळे किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने विम्याची (Insurance) तक्रार करावी लागणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता घटना किंवा नुकसान झाल्यानंतर ७२ तास म्हणजे तीन दिवसांच्या आत तक्रार करावी लागेल. समजा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार केली नसेल तर तुम्हाला मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

Unseasonal Rainfall । सरकारचा मोठा निर्णय! अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करणार

तक्रारीसाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात अगोदर प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स नावाचे अॅप डाऊनलोड करा.
  • योग्य ती भाषा निवड.
  • पुढे चार पर्यायांपैकी तीन नंबरचा पर्याय ‘नोंदणी खात्याशिवाय खाते सुरू ठेवा’ पर्याय निवडा.
  • आता पाच प्रकारचे पर्याय तुम्हाला दिसतील.
  • ‘पीक नुकसान’ हा पर्याय निवडा.
  • आता पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती असे दोन पर्याय दिसतील.
  • त्यातील ‘पीक नुकसानीची पूर्वसूचना’ हा पर्याय निवडा.
  • तुमचा मोबाईल नंबर टाका.
  • तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकून तो सबमिट करा
  • पुढे तयात हंगाम, वर्ष, योजना, राज्य माहिती भरा
  • आता ‘नोंदणीचा स्रोत’ या रकान्यात विम्याचा फॉर्म कुठून भरला त्याची माहिती भरा.
  • विम्यामध्ये दाखल केलेल्या पैकी कोणत्या पिकाचे नुकसान झाले आहे ते काळजीपूर्वक निवडा.
  • फोनवरील लोकेशनचे अॅक्सेस अॅपला द्या.
  • तपशीलामध्ये घटनेचा प्रकार, नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी, घटनेचा दिनांक, घटनेच्या वेळेस पिक वाढीचा टप्पा, फोटो आणि व्हिडिओ अशी माहिती टाका.
  • आता ‘सादर करा’ या बटणावर क्लिक करा
  • सर्वात शेवटी तुम्हाला Docket ID नंबर येईल तो जपून ठेवावा लागणार आहे. कारण या नंबरवरून तुम्हाला तक्रारीचे स्टेटस पाहता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *