Dairy business

Dairy business । मस्तच! आता सरकारी अनुदानावर सुरु करा डेअरी व्यवसाय, साडेचार लाखांपर्यंत मिळेल अनुदान; वाचा महत्वाची माहिती

बातम्या

Dairy business । शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत विविध योजना सुरु करत असते. ज्याचा त्यांना फायदा होतो. अनेकजण शेतीसोबत अनेक जोडव्यवसाय (Dairy business loan) सुरु करत असतात. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. विशेष म्हणजे सरकार आता कृषीशी संबंधित जोडव्यवसाय सुरु करण्यासाठी देखील अनेक योजना सुरु करत आहे.

Success Story । प्रेरणादायी! मुलाने फेडले कष्टाचे पांग, मेहनतीच्या जोरावर झाला पीएसआय

अनेकजण पशुपालनाचा व्यवसाय सुरु करतात. दुग्ध व्यवसायाला (Business loan) प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नाबार्ड योजनेअंतर्गत (NABARD Scheme) एक नवीन घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी 30 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची घोषणा करण्यात आली आहे. काय आहे नाबार्ड योजना? जाणून घ्या.

Paddy Procurement । ‘या’ जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांचे थकले ३१६ कोटी रुपये, नेमकं प्रकरण काय?

कोणाला मिळतो लाभ?

नाबार्ड योजनेचा लाभ शेतकरी, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, शेतकऱ्यांचे संघटित गट तसेच छोट्या-मोठ्या कंपन्या आणि असंघटित क्षेत्र इत्यादींना या योजनेचा लाभ घेता येतो.

E-Crop Registration । आता एकाच ॲपद्वारे ई-पीक नोंदणी सातबारावर होणार; जाणून घ्या

कोण देते कर्ज?

डेअरी फार्म योजनेच्या माध्यमातून व्यवसायिक बँका, प्रादेशिक बँका, राज्य सहकारी बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका व नाबार्ड कडून पुनर्वित्तासाठी पात्र असणाऱ्या इतर संस्थांच्या माध्यमातून कर्ज देण्यात येते.

Hydroponics Technology । धक्कादायक! तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकवला गांजा, पुढं झालं असं काही की…

किती मिळते कर्ज?

समजा तुम्ही या योजनेच्या माध्यमातून 13 लाख रुपये पर्यंतच्या दुधाच्या उत्पादनासाठी आवश्यक उपकरणे खरेदी केले तर त्यावर तुम्हाला 25% पर्यंत अनुदान म्हणजे साडेतीन लाख रुपये पर्यंत अनुदान मिळते. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अर्जदारांकरिता या योजनेमधून साडेचार लाख रुपयांचे अनुदान मिळते.

Farm Pond Scheme । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून २३ हजार शेततळ्यांना मंजुरी

असा करा अर्ज

अर्ज करण्यापूर्वी कोणता डेअरी फार्म उघडायचा आहे हे ठरवावे लागेल. अर्जासाठी तुम्हाला तुमच्या परिसरातील नाबार्ड कार्यालयामध्ये जावे लागेल. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन याची माहिती मिळवू शकत. बँकेमध्ये गेल्यावर तुम्हाला अनुदानाचा फॉर्म भरून या माध्यमातून अर्ज करावा लागेल. समजा कर्जाची रक्कम वाढली असेल तर त्या व्यक्तीकडे त्याचा प्रकल्प अहवाल नाबार्डला सादर करावा लागेल.

Artificial Intelligence । आर्टिफिशीयल इंटेलिजन्सवर होणार उसाची शेती? कसं काम करत हे तंत्र? जाणून घ्या

आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, बँक खात्याचा कॅन्सल चेक, डेअरी प्रोजेक्ट रिपोर्ट इत्यादी कागदपत्रांची गरज असते.

Government Schemes । शेतकऱ्यांनो, ड्रीपसाठी तुम्हीही करू शकता अर्ज? ‘हे’ कागदपत्रे लागतात; जाणून घ्या किती मिळेल अनुदान?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *